Thursday, 7 January 2016

भर पावसात ...

तो खिडकीत ,ती अंगणात 
जून च्या महिन्यात भर पावसात 

तिची थेंबांची भाषा 
त्याचे भिजलेले इशारे 
तिने चोरलेल्या नजरा 
त्याला झोंबणारे वारे 

ती थेंबाशी खेळणारी 
ती वाऱ्याशी बोलणारी 
ती स्वतः शीच लाजणारी
ती मदहोश नाचणारी

त्याचे ओले शब्द, ओल्या ओळी
आणि भिजलेली ती ,
त्याच्या भिजलेल्या कवितेत

तो खिडकीत ,ती अंगणात
जून च्या महिन्यात भर पावसात

No comments:

Post a Comment