Thursday, 7 January 2016

गोकर्ण-अचानक भयानक – १

पुणे ते म्हापसा रात्रीचा प्रवास होता म्हणायला, स्लीपर बस असल्यामुळं मी झोपूनच गेले. मडगाव पर्यंत जाणारी बस म्हापश्यालाच बंद पडली. सकाळचे ८ वाजलेले. दुसरी बस येणार होती मडगाव ला घेऊन जायला पण मला वाट पाहण्यात काही अर्थ नाही वाटला. रस्त्याच्या कडेला एक हॉटेल होतं. तिथ जाऊन मी फ्रेश झाले आणि पणजी साठी जाणारी गोवा स्टेट ट्रान्सपोर्ट ची बस पकडली. माझ्या मागे बाकीचे प्रवाशी पण त्या बस मध्ये चढले. त्यांनीही विचार केला असावा कि इथं “त्या दुसऱ्या” बस ची वाट बघत बसण्या पेक्षा १५-२० मिनिटात पणजीत पोहोचू.

मला हे माहित होता कि, गोकर्णला जायसाठी मला मडगाव मधूनच बस मिळणार होती. आणि तिथं जायला पणजीहून जावं लागतं हे हि माहित होतं. पणजीतून मडगाव साठी लगेच बस मिळाली. म्हापश्यातून ३५ रुपयात मी मडगाव ला पोहोचले. बस स्टॉप वर मी ब्रेकफास्ट केला. थोडा वेळात लगेचच मला अंकोला पर्यंत बस मिळाली. या पुढचा प्रवास मी या आधी कधीही केला नव्हता. बस कानाकोना पर्यंत भरलेली होती, नंतर रिकामी झाली. मागचा मोठा sit रिकामं पाहून मला control नाही झाला. backpack sit च्या खाली ठेवलं आणि sling bag चा belt हातात अडकवून मी चक्क पूर्ण बाकावर पाय पसरून झोपी गेले. मध्ये stops आले असतील बरेचसे, मला लोकांच्या चढण्या उतरण्याच्या आवाज यायचा, गोंगाट झाल्यासारखा वाटायचं. पण मी ठरवला होतं, जोपर्यंत मला हलवून कोणी उठ म्हणत नाही तोपर्यंत उठायचा नाही. शेवटी मला उठवलंच कोणीतरी, conductor होता तो, बोल्ला, madam, अंकोला आ गया. यहासे कुमटा के लिये बस मिल जायेगा. तो मला बस पर्यंत पोहोचवायला आला आणि दुसरया conductor ला सांगितला कि, madam को कुमटा मे उठा देना. बहुदा मी बस मध्ये झोपूनच राहील कि काय अशी त्याला शंका आली असावी.  

माझ्या डोक्यात सहज एक विचार आला. माझ्याबरोबर कोणी असता तर, मी दहा वेळा विचार केला असता कि शेवटच्या बाकावर जाऊन झोपू कि नको. कदाचित माझ्या डोक्यात तसा विचार आला पण नसता. मला झोपेची किती गरज आहे यापेक्षा माझ्याबरोबरची व्यक्तीला माझ्या अश्या वागण्यामुळे काय वाटेल हा विचार करण्यामध्येच माझा सगळा प्रवास संपला असता. पण ती झोप माझ्यासाठी खुप महत्वाची होती. त्यामुळे प्रत्येक वेळेस दुसऱ्याला काय वाटेल यापेक्षा आपल्याला काय हवय याकडेही लक्ष द्यायला हवं.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्यामध्ये एक वेगळाच self confidence असतो मी जेंव्हा एकटी प्रवास करते तेंव्हा. मला अजिबात भीती वाटत नाही कशाचीच. झोपेत मला कोणी काही करेल, माझी bag घेऊन पळून जाईल असं दूर दूर पर्यंत माझ्या डोक्यात आला नव्हतं तेंव्हा. कोणतीतरी extra positive energy संचारते माझ्यात. कधी कधी मला वाटत एका ठिकाणी राहून मी “ती” energy miss करतेय, म्हणूनच कि काय मी फिरत असते, शोधत तिला. आणि मला असच जगायचं, असच शिकायचं, अशीच अनुभूती घ्यायाचीये आयुष्याची, असच मोठा व्हायचय.

नेहमी प्रमाणे ह्या प्रवासात मला जितके drivers आणि conductors भेटले, मदत करणारे भेटले. आणि बस पण लगेच मिळत गेल्या. मी कुठही pre booking वगेरे केलेलं नव्हतं ह्या वेळेस. म्हटलं बघू काय होतं ते. थोडीशी risk थोडसं adventure आणि खुप सारा confidence.

कुमटा ला जाणारी बस सुरु झाली. ह्या वेळेस मला last sit काही भेटलं नाही. एक चाळीशीतील कोकणी महिला आणि तिची १३-१४ वर्षांची मुलगी माझ्या शेजारी बसल्या. त्यांनी दोघींनीही मस्त गजरे माळलेले होते केसात. आणि खूप चमकीचे कपडे घातलेले होते. थोडा वेळाने मी बस मध्ये नजर फिरवली तर सगळ्यांनी तितक्याच चमकीचे कपडे घातलेले होते. ते गजरे जरा वेगळ्याच प्रकारे गुंफलेले होते. मी तिला विचारण्याचाही प्रयत्न केला पण काही सफल नाही झाला. माझी भाषा तिला अजिबातच समजत नव्हती. आम्ही वेळोवेळी smiles exchange करत होतो.

इकडं तिकडं बघत, थोड झोपत, आणि गाणे ऐकत माझा प्रवास सुरु होता. डिसेंबर चा महिना सुरु होता पण कोकणात कशाचा हिवाळा अन काय. भयानक उकडत होतं. 
कुमटा तीथुन मला लगेच गोकर्ण साठी बस मिळाली.  मडगाव पासून गोकर्ण पर्यंत प्रवासाचे जास्तीत जास्त २५० रुपये लागले असतील मला.

किरील ला message करून अर्धा तास झाला होता पण त्याचा अजून काही reply नव्हता आला. किरील, रशियाचा होता  आणि भारतीय संस्कृतीने भारावून गेल्यामुळे गोकर्ण मध्ये राहत होता.. या आधी तो तिबेट मध्ये राहायचा. तिबेटीयन बौद्ध वांगमय रशियन भाषेत translate करायचं काम तो करत होता. आणि हिंदू अध्यात्माचा खूप अभ्यास केलेला होता त्याने. गोकर्ण मधला  दोन दिवसाचा मुक्काम मी त्याच्या घरीच करणार होते. 

गोकर्ण ला पोहोचले मी, अडीच वाजलेत दुपारचे. भूक लागलेली आहे. किरील चा पत्ता नाही. सरळ कुडळे beach वर जावं कि किरील च्या reply ची वाट पहावी विचारच करत होते तेवढ्यात त्याचा call आला. तो राम मंदिरात पूजेला बसला होता. त्यामुळे माझा message बघता आला नव्हता. यायला त्याला एक तास भर वेळ होता. जवळच एक छोटंसं restaurant होतं. मी म्हटलं जेवण करून घ्यावं. कर्नाटक मध्ये असल्यामूळं मी जास्त विचार न करता एक मसाला डोसा ऑर्डर केला.

खूप प्रवास झाला होता, जवळजवळ १८ तास आणि ६०० किमी. पुणे ते म्हापसा. म्हापसा ते पणजी. पणजी ते मडगाव. मडगाव ते अंकोला. अंकोला ते कुमटा. कुमटा ते गोकर्ण. पण मला वाटतच नव्हतं कि मी इतक्या लांब आलेय आणि इतक्या वेळापासून वेगवेगळ्या बसेस पकडून प्रवास करतेय.

एक विसरलेच, पुणे ते म्हापसा मला ११०० रुपये लागले sleeper coach बस चे, Christmas season मुळे तिकिटांची किंमत वाढली होती. नाहीतर पुणे ते गोवा साधारणतः ७००-८०० रुपये लागतात off season मध्ये. 

No comments:

Post a Comment