Wednesday, 6 January 2016

प्रवासातल्या कविता...1






Place-Shnongpdeng, 7kms aways from Dawki, India-Bangladesh Border, Meghalaya, India.
 कुठं  पोहोचले मी, मनी न ध्यानी
निरव शांतता आणि
आरश्या सारखं स्वच्छ नितळ नदीचं पाणी
त्यात गर्द हिरव्या झाडांचे प्रतिबिंब
उगाचच किनाऱ्यावर भिजलेल्या होड्या चिंब
डोंगरावरून विरणारे धुके
पकडायला गेल्यावर हातात येतंय कुठे
ती झोपडी ना म्हाताऱ्या शबरीसारखी वाटली जरा
मोडकळीस आलेली तरीही तरुण वाटली मला

No comments:

Post a Comment