Thursday, 7 January 2016

नवा छंद

तुझ्याशी बोलले तर मलाच मी कळाले असं  वाटतंय
चिकार  होत्या कविता आधी, आज गझलेत बुडाल्यासारखं वाटतंय 

स्वच्छंदी एक झोका  मी काल गात होते 
नियमात रेशमाच्या आज गुंफल्या सारखं  वाटतंय 

तू गीतकार  मोठा, माहित आहे 
पर्वा नाही कुणाची तुला, ते ही  माहित आहे 
पण आजकाल ना, दुर्लक्षित राहण्याचा नवा छंद लागल्यासारखं  वाटतंय

तुझ्याशी बोलले तर मलाच मी कळाले असं  वाटतंय


No comments:

Post a Comment