Saturday, 15 June 2013

बघ न

बघ ना तुझ्यावाचून सगळं अडतं

शब्द रुजायला पण भरलेलं आभाळ लागतं


Wednesday, 13 February 2013

अचानक


आज अचानक ढग दाटून आले. दुपारची उन्हं अंधाराने झाकून गेले. ते पाहून चेहऱ्यावर आपसूक एक रेघ हसली. भिरभिर आभाळाकडं बघत, नजर माझी कित्ती सांगू नाचली. सगळा शीण, सगळा थकवा क्षणात उडाला. सगळा ताण सगळा वैताग दूर दूर पळाला. आणि त्याच्या  जागी  माझ्यातल्या  लेखकाला भर उन्हात ओलाचिंब विषय  मिळाला . अशी मग ओढ  तेंव्हा लागली माझ्या जीवाला. कधी एकदा घेऊन येतील ढग हे माझ्या पावसाला. project , documents ,plans काय deadline ची ही आठवण पडली. बघ पावसा तुझी साधी चाहूलही कशी मला  नडली. पण काहीही असो, आजचा दिवस तुलाच द्यायचा होता. कित्ती दिवसांनी आज तू येणार होता. ते ही अचानक. कित्ती दिवसांनी आज ढग दाटले. कित्ती दिवसांनी ते डोंगराला टेकले. कित्ती दिवसांनी मी डायरी उघडली. कित्ती दिवसांनी आज शब्द सुचले. ते ही अचानक !!!