Monday, 20 August 2012

उगीचंच स्वप्न जागती रोज निजताना
किनारे भिजतात न जसे लाटांना धरताना 

Saturday, 18 August 2012

भिजलेली पायवाट

भिजलेली पायवाट अन हात तुझ्या हातात
मग जगाचं कसलं  भान मी ही नसते माझ्यात 
पावलंही हळू हळू  चालतात संपूच नये वाट म्हणून मुद्दामुन  थांबतात 
मला न तेंव्हा खुप बोलायचं असतं 
पण नेमकं तेंव्हाच भावनांना आतल्या आत भांडायला सुचतं 
कसं सावरू स्वतःला तेंव्हा  माझंच मला नाही उमगत 
कावरे  बावरे डोळे अन वादळ उठतं ऊरात 
मग जगाचं कसलं भान मी ही नसते माझ्यात 
लिहायला आवडतं म्हणून नाही
 तुला शब्दांतून पहायचं  असतं म्हणून कवितांचा हा अट्टहास  !!!