Monday, 20 August 2012
Saturday, 18 August 2012
भिजलेली पायवाट
भिजलेली पायवाट अन हात तुझ्या हातात
मग जगाचं कसलं भान मी ही नसते माझ्यात
पावलंही हळू हळू चालतात संपूच नये वाट म्हणून मुद्दामुन थांबतात
मला न तेंव्हा खुप बोलायचं असतं
पण नेमकं तेंव्हाच भावनांना आतल्या आत भांडायला सुचतं
कसं सावरू स्वतःला तेंव्हा माझंच मला नाही उमगत
कावरे बावरे डोळे अन वादळ उठतं ऊरात
मग जगाचं कसलं भान मी ही नसते माझ्यात
लिहायला आवडतं म्हणून नाही
तुला शब्दांतून पहायचं असतं म्हणून कवितांचा हा अट्टहास !!!
तुला शब्दांतून पहायचं असतं म्हणून कवितांचा हा अट्टहास !!!
Monday, 30 July 2012
Thursday, 26 July 2012
:)
त्या पावसात मनसोक्त भिजताच नाही आलं
त्यानं खूप भिजवलं मलाच भिजता नाही आलं
Wednesday, 25 July 2012
तुला आठवतं का ...
दिवस कसे उडून जातात ना
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...
आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...
त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...
तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...
त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...
आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...
त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...
तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...
त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...
सावल्या ...

सावल्यांमध्ये कधी-कधी मग तुझं चेहरा दिसतो ...
मागे वळून बघितलं तर तिथं तू नसतो ...
एक छोटीशी पायवाट वळणं-वळणं घेत एकटीच चाललेली असते ...
खूप दूर नजर गेल्यावर तुझ्यापर्यंत नाही आपल्यापर्यंत पोहोचलेली दिसते ...
कदाचित तुझ्या सावली पासून तुझ्या असण्यापर्यंत जोडलेली ...
आठवते मग वाट दुसरी आपल्या पायवाटेला फुटलेली ...
अन तुझी साथ माझ्या हातातून सुटलेली ...
खूप अंतर काटले मी आता एकटं-एकटं चालून ..
आणि प्रत्येक पावलावर तुझे रूप सावल्यांमध्ये पाहून ...
सहज सुचलं म्हणून !!!
भविष्याचा विचार करून काय फायदा जर ते बदलणार नसेल...आणि वर्तमनाचा विचार करून विधिलिखित सत्याला कशाला challenge करायचे उगाचच !!! आपले flashback मधे मस्त वाटते जगायला.... rewind करा किती speed ने , हवे तिथे pause करा न वाटेल ते play करा....छान वाटते जुन्या गोष्टी आठवायला, कळत नकळत केलेल्या चुकांवर आपणहून हसायला, चुकत राहावे, हसत राहावे...अन् जगत रहाव्यात आठवणी... ओंझळीत धरून ठेवलेल्या, गाठोड्यात बांधून आणलेल्या, मनामधे खोलवर जपलेल्या, तुडुंब भरलेल्या डोळ्यांमधून सांडू न दिलेल्या...आठवणी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या .... आठवणी पाटी, pensil अन दप्तराच्या....आठवणी आईच्या रागावण्याच्या...आठवणी बाबांच्या प्रेमाच्या....आठवणी college च्या धुंद दिवसांच्या ...आठवणी result न आलेल्या practcals च्या ... आठवणी चोरून पाहिलेल्या picture च्या ....आठवणी bunk केलेल्या lectures च्या ....आठवणी airtell तो airtell १० paise calling च्या ....आठवणी १० वाजायची वाट पहिल्याच्या ....आठवणी कट्ट्यावरच्या हसण्याच्या, रुसण्याच्या, मैत्रीच्या, अन विनाकारण भांडणाच्या...आठवणी पावसाळ्यातल्या कवितांच्या ... आठवणी morning walk अन रात्रीच्या चंद्राच्या ...आठवत राहावे अन जगत राहावे !!!
रोजचा पाऊस !!!
पावसाशी बोलायचं,पावसाशीच हसायचं
थोडं कुठं वारं आलं कि हातावर झेलायचं
रोजचंच झालाय आता ढगांबरोबर फिरणं
आणि रोजचं पावसा, तुझं माझ्या अंगणात उतरणं
उतरून गप्प राहशील कसा, दरवळतोस सगळीकडे जसा प्राजक्ताचा सडा
पण खरं सांगू, तेंव्हा न तू मला माझ्यासारखाच वाटतो, थोडासा वेडा
हळू हळू मग दिवस रात्रीकड सरतो
आणि ओल्या अंगणात फ़क़्त तू आणि मी उरतो
पावसाकड बघायचं, बघता बघता हरवायचं
हरता हरता मग पावसालाच ओलेचिंब भिजवायचं
रोजचंच झालाय आता आपला असं खेळणं
आणि रोजचं पावसा, तुझं माझ्या अंगणात पसरणं
Monday, 18 June 2012
तुझे शब्द माझी कविता !!!
तुझी कविता वाचून मलाही चार शब्द सुचलेआणि गम्मत ऐक न
प्रत्येक शब्दात तुझेच रूप दिसले
मी स्वताशी हसतच होते तेवढ्यात एक सर आली
पावसाची कि काय म्हणून बघितला तर डोळ्यातून वाहू लागली
एक एक थेंब तिने अंगणात टाकला
आठवणींचा एक डोह माझ्याच पापण्यांखाली साचला
पुन्हा मग तोच खेळ सुरु झाला
तुझी कविता आणि माझ्या शब्दांचा
माझे शब्द आणि तुझ्या चेहऱ्याचा
तुझा चेहरा आणि माझ्या आठवणींचा
थेंब आणि सरीसारखा मेळ सुरु झाला
Sunday, 5 February 2012
मृद्गंध श्रावणीचे !!!
ते भास ओले होते ,ते श्वास ओले होते ,
मृद्गंध श्रावणीचे ,
अंतरीचे गीत होते
चिंब वारे, चिंब शहारे
चिंब रानी चिंब पिसारे
मृद्गंध श्रावणीचे
मन मयूर फुलवीत आले
अगतिक रिमझिम धारा
व्याकूळ होते धरती
मृद्गंध श्रावणीचे
पांघरून येते प्रीती
आभाळ गहिवरलेले
नभ साथ द्याया नाही
मृद्गंध श्रावणीचे
गीत आसवांचे होई
भिजलेल्या पावूलावाटा
भिजलेल्या लक्ष कहाण्या
मृद्गंध श्रावणीचे
प्रणयाला साद देती
Thursday, 26 January 2012
Subscribe to:
Posts (Atom)








