तुझं येणं म्हणजे रिमझिम कविता,
जाणं म्हणजे मुसळधार किस्सा होऊन जातो...
तू असताना तुझ्यात भिजणं वेगळं,
नसतानाही तुझं असणं अदुश्य पांघरुणासारखं अंगावर देतो.
कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला ….
कुठूनही , कसंही उठण्याचा प्रयत्न केला...
तरी स्पर्श मात्र होतो...
तू असताना तुझ्यात भिजणं वेगळं …
तू नसताना तुझं असणं म्हणजे सगळं ….
येताना भरभरून घेऊन येतो
जाताना सगळंच देऊन जातो
गेल्यावरही चारी ऋतुंचा हिस्सा बनून राहतो
तुझं येणं म्हणजे रिमझिम कविता
जाणं म्हणजे मुसळधार किस्सा होऊन जातो ...
Very nice
ReplyDelete