Monday, 18 June 2012

तुझे शब्द माझी कविता !!!

तुझी कविता वाचून मलाही चार शब्द सुचले
आणि गम्मत ऐक न
प्रत्येक शब्दात तुझेच रूप दिसले
मी स्वताशी हसतच होते तेवढ्यात एक सर आली 
पावसाची कि काय म्हणून बघितला तर डोळ्यातून वाहू लागली 
एक एक थेंब तिने अंगणात टाकला 
आठवणींचा एक डोह माझ्याच पापण्यांखाली साचला 
पुन्हा मग तोच खेळ सुरु झाला 
तुझी कविता आणि माझ्या शब्दांचा 
माझे शब्द आणि तुझ्या  चेहऱ्याचा 
तुझा चेहरा आणि माझ्या आठवणींचा 
थेंब आणि सरीसारखा मेळ सुरु झाला 

Sunday, 5 February 2012

मृद्गंध श्रावणीचे !!!

ते भास ओले होते ,
ते श्वास ओले होते , 
मृद्गंध श्रावणीचे ,
अंतरीचे गीत होते 

 चिंब वारे, चिंब शहारे 
चिंब रानी चिंब पिसारे 
मृद्गंध श्रावणीचे
मन मयूर फुलवीत आले

अगतिक रिमझिम धारा 
व्याकूळ होते धरती 
मृद्गंध श्रावणीचे
पांघरून येते प्रीती 

आभाळ गहिवरलेले 
नभ साथ द्याया नाही  
मृद्गंध श्रावणीचे
 गीत आसवांचे होई 

भिजलेल्या पावूलावाटा
भिजलेल्या लक्ष कहाण्या 
मृद्गंध श्रावणीचे
प्रणयाला साद देती 

Thursday, 26 January 2012

तू

तू जवळ  असताना खूप सुचतं 
पावसालाही मग भिजावंसं वाटतं